“भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा”; शरद पवार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 19 Views 3 Min Read
3 Min Read

कोल्हापूर: कामगार नेते स्वर्गीय गोविंद पानसरे यांची हत्या होऊन नऊ वर्षे झाली तरी त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात सर्वच यंत्रणा अयशस्वी ठरल्या आहेत. मात्र त्यांची हत्या झाली असली तरी गोविंद पानसरे यांचे कार्य, रस्त्यावरील संघर्ष हे त्यांचे अनुयायी आज ही पुढे घेऊन जात आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांचे कार्य आणि संघर्ष नव्या पिढीला कळावे व प्रेरणा मिळावी, यासाठी कोल्हापुरात त्यांच्या स्मारक उभारण्यात आले असून स्मारकाचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते व शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेच्या प्रांगणात पार पडला.

पानसरे स्मारकाचे लोकार्पण

नऊ वर्षापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आज या घटनेला नऊ वर्ष पूर्ण झाली. मात्र अद्याप मारेकरी मोकाट फिरत असून तपास यंत्रणांना अद्याप मारेकरीपर्यंत पोहोचण्यात अपयश आले आहे. मात्र नऊ वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाल्यानतर कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी सामाजिक जाणिवेचे तसेच गोविंद पानसरे यांच्या सार्वजिक कार्याचे भान ठेवून त्यांच्या हत्येनंतर झालेल्या शोकसभेत उचित असे स्मारक उभे करण्यात पुढाकार घेईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

- Advertisement -

कमी पडणारा २५ लाखांचा निधी आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून दिला आणि यातून कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले असून त्याचे लोकार्पण सोहळा आज खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी या सोहळ्यास भाकपचे जनरल सेक्रेटरी खासदार डी. राजा, राज्याचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र कानगो, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, मेघा पानसरे तसेच कॉ. पानसरे अनुयायी उपस्थित होते.

- Advertisement -

प्रधानमंत्री केवळ वीस मिनिटांसाठी सभागृहात येतात
कॉम्रेड पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणानंतर खासदार शरद पवार यांनी अनुयायांशी संवाद साधताना हा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून पानसरे, दाभोळकर यांच्यावर हल्ला करत पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. मात्र विचाराची संघर्ष करायचा असेल तर विचाराने करायला हवं मात्र ज्यांच्याकडे विचार नाही, अशा प्रवृत्तीने कायदा हातात घेऊन असा भ्याड हल्ला करू शकतात, हे त्याचे उदाहरण आहे. आज प्रतिगामी शक्ती या वाढत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना पुरोगामी विचारांची किंचित सुद्धा आस्था नाही.

- Advertisement -

Share This Article