अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने सार्वजनिक शिव जयंती महोत्सव उत्साहात साजरा !

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 9 Views 1 Min Read
1 Min Read

लातूर :- अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने सार्वजनिक शिव जयंती महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षीही उत्साहामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी जयभवानी जय शिवाजी च्या घोषणानांनी संपूर्ण परिसर दणानून गेला. सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. राजकुमार सूर्यवंशी पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या आश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच मुस्लीम क्रांती सेनेचे अध्यक्ष हमीद भाई पठाण यांच्या हस्तेही पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रामहरी काका सूर्यवंशी, शाम भाऊ जाधव, अॅड. विकास गरड, ज्ञानेश्वर पाटील कळंबकर, बालाजी सूर्यवंशी, हरिश्चंद्र गवळी, सालार भाई शेख, किशोर ससाणे (प्रसिद्धी प्रमुख), अजित मत्ते, अजिंक्यराणा सूर्यवंशी पाटील, अयुवीर गरड, रामभाऊ सावकार, अमोल नंदगावे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article