उत्तर प्रदेश एटीएसकडून छत्रपती संभाजीनगरमधील 14 जणांना नोटीस

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 2 Min Read
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर  : एटीएसकडून छत्रपती संभाजीनगर शहरातील 14 जणांना नोटीस देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने छत्रपती सभाजीनगर शहरातील 14 लोकांना ही नोटीस दिली आहे. 15 ते 18 जानेवारीदरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना या नोटीसमध्ये दिल्या आहेत. जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. यात सदर कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमधील 14 जणांना नोटीस दिलीय.

- Advertisement -

एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. यात सदर कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले. अयोध्येमधील धार्मिक स्थळांबाबत या बैठकीत उल्लेख झाल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी कळाली. त्यांनी तात्काळ हे पुरावे उत्तर प्रदेश एटीएसला पाठवले.

- Advertisement -

तेलंगणा पोलिसांकडून माहिती मिळताच एटीएस अॅक्शन मोडमध्ये आली. उत्तर प्रदेश एटीएसने ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेशमधील एटीएस पथक छत्रपती संभाजीनगर शहरात तपासासाठी आलं. त्यानंतर तपासाला वेग आला. या बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील 14 जणांना उत्तर प्रदेश एटीएसने नोटीस बजावली. तसंच एटीएस मुख्यलयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

उत्तर प्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसला या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्या पत्राची दखल घेतली गेली नाही, अशी माहिती तपास यंत्रणांमधील सुत्रांनी दिली आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाचं गांभीर्य लक्षात घेता उत्तर प्रदेश एटीएसने पावलं उचलली आहेत. उत्तर प्रदेश प्रशासनाने लखनौमधल्या दहशतवादविरोधी पोलीस स्टेशनमध्ये कलम 153 ए, 153 बी, 13/18 बेकायदेशीर क्रिया (यूएपीए) अधिनियम 1967 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला वेग आला आहे. उत्तर प्रदेश एटीएसने छत्रपती संभाजीनगरमध्ये येत चौकशी केली. तसंच संशयितांना नोटीस बजावली आहे.

Share This Article