एकाही अहवालात मराठा समाजाला मागास म्हटले नाही

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 7 Views 2 Min Read
2 Min Read

हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर 2023 | आमची लायकी काढली जात आहे. आमची लायकी काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आमची लायकी नाही असे म्हणतात तर आमच्या पंगती का येत आहे? असा प्रश्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना केला. हिंगोलीतील ओबीसी एल्गार परिषदेतून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला. तसेच आमची लायकी काढण्याचा यापुढे प्रयत्न केल्यास तुमचे महाराष्ट्रात फिरणे बंद करु, असा इशारा दिला.  1967 पासून आजपर्यंत कुठेच मराठा समाजास मागास म्हटले गेले नाही. सर्वच अहवालात मराठा समाजाला प्रगत समाज म्हटले होते. तेच छगन भुजबळ आता सांगत आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर खोटे आरोप लावत आहात, असा हल्ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केला.

- Advertisement -

सर्वच अहवालांनी मराठा समाजास प्रगत दाखवले

मंडल आयोगाने मराठा समाजास सुपरकास्ट म्हटले आहे.  मराठा समाजासंदर्भात १९९४ पासून आतापर्यंत सात आयोग नेमले गेले आहे. परंतु एकाही आयोगाने मराठा समाजास मागास म्हटले नाही. त्यानंतर हे आमच्यावर कसे आरोप लावू शकतात? असा प्रश्न बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

मनोज जरांगे यांचा धिक्कार करतो

आमचे नेते तुमच्याविषयी एखादा शब्द बोलत असतील तर त्यांना शिवीगाळ केली जाते. आमची लायकी काढली जाते. तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. यामुळे आम्ही मनोज जरांगे यांचा धिक्कार करतो. त्यांचा निषेध करतो. यापुढे ओबीसीच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत करु नका, असा इशारा त्यांनी दिला.

- Advertisement -

Share This Article