देशात 24 तासांत 600 हून अधिक नवे कोरोनाबाधित, दोन रुग्णांचा मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 15 Views 2 Min Read
2 Min Read

देशात गेल्या 24 तासांत 600 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे. ही नवीन आकडेवारी फार चिंताजनक आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे टेन्शन वाढलं आहे. नवीन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

- Advertisement -

कोरोनाचे 628 नवे रुग्ण

देशात कोरोना व्हायरसचे 628 नवीन रुग्ण सापडले आहेत. यातील बहुतेक रुग्ण नव्या JN.1 सब-व्हेरियंटचे असल्याचं समोर आलं आहे. देशातील सक्रिय कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4054 झाली आहे, या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. कर्नाटकात गेल्या 24 तासांत देशात 74 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यासोबतच दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे.

- Advertisement -

गेल्या 24 तासांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंतच्या बळींचा आकडा पाच लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत एकूण 5,33,334 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत एकूण 4,50,09,248 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 4,44,71,860 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 220 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

कर्नाटकात वाढते कोरोना रुग्ण

कर्नाटकातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे सरकारची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या 24 तासांत कर्नाटकात कोरोनाचे 74 नवीन रुग्ण आढळून आले असून दोन मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सक्रिय रुग्णांची संख्या 464 झाली असून मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे.

घाबरू नका, काळजी घ्या

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यासोबतच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. सुट्ट्यांमुळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे घेतलेल्या निष्काळजीपणामुळे चिंत वाढली आहे. पार्ट्या आणि गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Share This Article