जळगांव: जळगावात तीन दिवसांपूर्वी टोळक्याने भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार केला होता.या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले आहे
- Advertisement -
चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या ५ जणांनी कट्ट्यातून फायरिंग करत जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ५ हल्लेखोर आणि कट रचनारे २ असे एकुण ७ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.