महाराष्ट्रातील या गावास अतिरेक्यांनी स्वतंत्र केले घोषित, नाव ‘अल शाम’ दिले

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 43 Views 2 Min Read
2 Min Read

ठाणे: राष्ट्रीय तपास यंत्रणेनं शनिवारी ठाण्यात छापेमारी करत १५ जणांना अटक केली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी धाडी टाकत एनआयएनं आयसिसशी संबंधित १५ जणांना बेड्या ठोकल्या. आरोपींमध्ये आयसिस मॉड्युलच्या नेत्याचादेखील समावेश असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यानं दिली. त्यानं अन्य सदस्यांना बयाथ म्हणजेच संघटनेसाठी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली होती.

- Advertisement -

शनिवारी पहाटे ठाणे, पुणे, भिवंडीतील पडघा परिसरात एनआयच्या पथकांनी छापे टाकले. एनआयएच्या ८० गाड्या परिसरात दाखल झाल्या. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोकड, धारदार शस्त्रास्त्रं, गुन्हगारी कृत्यांच्या तयारीशी संबंधित कागदपत्रं, स्मार्ट फोन आणि अन्य डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत.

- Advertisement -

आयसिस मॉड्युल उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनं एनआयएनं अनेक ठिकाणी छापे टाकले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साकिब नाचनचा समावेश आहे. तो पडघा गावचा खलिफा होता. त्यानंच अन्य आरोपींना संघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली होती. त्यांनी पडघा गावाला ‘अल शाम’ म्हणजेच ‘मुक्त क्षेत्र’ म्हणून घोषित केलं होतं. पडघ्यात आयसिसचं साम्राज्य तयार करण्यासाठी तो प्रभावशाली मुस्लिम तरुणांना त्यांचं घर सोडून या ठिकाणी येण्यासाठी प्रोत्साहन देत होता.

- Advertisement -

मुख्य आरोपी आणि आयसिस मॉड्युलचा नेता साकिब नाचन संघटनेत सामील होणाऱ्या तरुणांना ‘बायथ’ (शपथ) द्यायचा. देशभरात आपलं नेटवर्क तयार करण्याचा त्यांचा मानस होता. त्यादृष्टीनं त्यांच्या हालचाली सुरू होत्या. एनआयएनं वर्षाच्या सुरुवातीला आयएसआय महाराष्ट्र मॉड्यूलच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून एनआयए आयसिसचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं धाडी टाकून कारवाया करत आहे.

Share This Article