मंत्रालयाला भीषण आग, चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 50 Views 2 Min Read
2 Min Read

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे. भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीच्या चार मजल्यापर्यंत आग पसरली आहे.  मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

- Advertisement -

भोपाळमधील वल्लभ भवन राज्य सचिवालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

भोपाळच्या सचिवालयात अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे. 9 मार्चला सकाळी सचिवालयाच्या इमारतीतून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. आग भीषण असल्याचा अंदाज घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या धुरावरून लावता येतो. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

- Advertisement -

भोपाळमधील अरेरा हिल्सवर असलेल्या वल्लभ भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या खिडकीतून धूर निघत असल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. तातडीने ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचं काम सुरू केलं. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने मंत्रालयात कर्मचारी नव्हते. सध्या वल्लभ भवन प्रशासनाने नुकसानीची कोणतीही माहिती दिलेली नाही.

गेट क्रमांक 5 आणि 6 मधील मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, ती पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. आग वाऱ्यासह वेगाने पसरली. अग्निशमन दलाचे पाच जवान अडकल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीतून उठणाऱ्या ज्वाळा आणि धूर दुरूनच दिसत आहेत. या आगीत अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या आगीच्या घटनेवर चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Share This Article