मराठा आरक्षण मिळणार कधी? विषारी द्रव्य प्राशन करत तरुणाने आयुष्य संपवलं

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 10 Views 2 Min Read
2 Min Read

परभणी: परभणी तालुक्यातील आर्वी येथील ३८ वर्षीय सुनील छत्रपती कदम या युवा शेतकऱ्याने मराठा आरक्षण कधी मिळेल या विवंचनेतून आज सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. विषारी द्रव्य प्राशन केल्याचे समजताच गावातील नागरिकांनी त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

सुनील कदम यांच्या पक्षात दोन मुले पत्नी आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुनील कदम हे आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर आरवी या गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये देखील त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

- Advertisement -

एकीकडे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील तीन महिन्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील सात मराठा बांधवांनी आत्महत्या केली असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सुनील कदम यांच्या आत्महत्येनंतर परभणी जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन जोपर्यंत सुनील कदम यांना शासकीय मदत जिल्हा प्रशासन जाहीर करणार नाही तोपर्यंत सुनील कदम यांचा अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील मदतीचे आश्वासन दिल्यानंतर आता पोलीस ठाण्यात जवाब नोंदविण्यात येत आहे.

सुनील कदम यांच्या आत्महत्येनंतर आर्वी गावासह परभणी जिल्हाभरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Share This Article