मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंनी सांगितले कारण

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 32 Views 2 Min Read
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर :  मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे.  परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची महित्यी जरांगे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहेत हे पाहावे. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्यात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “दडपशाही सुरू आहे, आंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की, ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी. आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई मेल करावे. सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहेत.

- Advertisement -

पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “मी 10टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेल. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघे हटणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जातीय द्वेष सुरू आहे. मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना, मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. मराठा नेत्यांना जाता की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. जातीने मतदान केले म्हणून तुम्हाला नेत्यांनी जवळ केले. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांच नुकसान करू नका. यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, असेही जरांगे म्हणाले.

- Advertisement -

एकीकडे मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून, फडणवीस मराठा द्वेषी असल्याचे सांगत आहे. मात्र, दुसरीकडे आज मराठवाड्यातील काही दैनिकांमध्ये फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत काय-काय केले याबाबत पानभरून जाहिरात छापण्यात आल्या आहेत. या जाहिरातमध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतांना आणि त्यांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील दैनिकात प्रामुख्याने ही जाहिरात पाहायला मिळत आहे.

Share This Article