भुजबळांच्या ऑडिओ क्लिपला मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 13 Views 1 Min Read
1 Min Read

छत्रपती संभाजी नगरः एका ओबीसी कार्यकर्त्यासोबत बोलताना छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये भुजबळ ओबीसी आंदोलन उभं करण्यासंदर्भात बोलत असल्याचं दिसून येत आहे. त्याला मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

- Advertisement -

व्हायरल ऑडिओ क्लिपवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, करेंगे या मरेंगे हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं वाक्य लढेंगे आणि जितेंगे आहे. महाराष्ट्रात शांततेत आंदोलनं सुरु आहे… बाकी प्रश्न ज्याच्या त्याच्या विचाराचा आहे. आम्ही अतिक्रमण केले नाही,आणखी लढाई सुरू आहे. आमचं घेतलं किंवा अतिक्रमण केलं असं नाहीये.. गरीब मराठ्यांच्या मुलांविषयी निष्ठूर राहणे योग्य नाही.

- Advertisement -

काय म्हणाले छगन भुजबळ?

- Advertisement -

एका कार्यकर्त्याशी बोलताना छगन भुजबळ म्हणातात की, आता आपण आवाज उठवला पाहिजे. मी एकटा कुठपर्यंत लढणार… तालुका तालुक्यात गावा गावात त्यांचे बुलडोजर चालत आहेत. यात ओबीसी वाचणार नाही.. करेंगे या मरेंगे… हेच करायला पाहिजे. असंही मरतंय आणि तसंही मरतंय.. सगळं झालं त्यांचं.. मी उभा राहतोय.

Share This Article