यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी तापमान

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 5 Views 2 Min Read
2 Min Read

सध्या राज्यातील काही भागात थंडीचा पारा (Cold weather) चांगलाच वाढला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान पारा खाली घसरला आहे. नाताळपर्यंत कोकणात देखील तापमानाचा (temperature)  किमान पारा खाली येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशांखाली गेलं आहे. सर्वात कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळ (Yavatmal)  जिल्ह्यात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशांखाली गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमान एका अंकांवर आलं आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. विदर्भासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.

- Advertisement -

विदर्भात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

  तापमान अंश सेल्सिअस  
यवतमाळ  8.7 
चंद्रपूर  9.4 
गोंदिया  9.2 
नागपूर  9.8 
वाशिम  9.8 
बुलढाणा  11 
ब्रह्मपुरी  11 
वाशिम   11 
अकोला  11.4 
वर्धा  10.6   
अमरावती  10.6   

विदर्भाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. तापमान घटल्यामुळं चांगलीच हुडहुडी भरली आहे. मध्य महाराष्ट्रातील तापमान हे 11 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

- Advertisement -

मध्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

  तापमान अंश सेल्सिअस  
पुणे  12 
जेऊर  12 
जळगाव  11.7 
मालेगाव  13 
महाबळेश्वर  12.9 
कोल्हापूर  16 
नाशिक  14. 
अहमदनगर  11.5 
सोलापूर  15.5 
सातारा  15.1 
सांगली  15.8 

मराठवाड्यात देखील गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील बहुंताश जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक ठिकाणी 11 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाचा पारा आहे.

Share This Article