भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना लोकसभा गृहनिर्माण समितीची नोटिस

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 2 Min Read
2 Min Read

नवी दिल्ली: राजस्थान, मध्य प्रदेश , छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे नेते पुढे विधानसभेत दिसतील. यानंतर आता लोकसभा गृहनिर्माण समितीनं विधानसभा निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या खासदारांना नोटिस पाठवली आहे. ३० दिवसांत सरकारी निवासस्थान सोडण्याच्या सूचना नोटिशीच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

राजीनामा देणाऱ्यांपैकी ८ जण खासदार आहेत, तर ३ जण मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना शहर विकास मंत्रालयाकडून निवासस्थानं मिळाली होती. लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या खासदारांना निवासस्थानं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात राकेश सिंह, अरुण साव, गोमती साई, रिती पाठक, बाबा बालकनाथ, राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि उदय प्रताप सिंह यांचा समावेश आहे.

- Advertisement -

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं २१ खाससदारांना तिकिट दिलं होतं. पैकी १२ खासदार निवडणूक जिंकले. राजस्थानातून राज्यवर्धन राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीणा, बाबा बालकनाथ, तर छत्तीसगडमधून अरुण साव, रेणुका सिंह आणि गोमती साई यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. मध्य प्रदेशात नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, राकेश सिंह आणि रिती पाठक यांनी विधानसभेत प्रवेश केला.

- Advertisement -

राजधानी दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांना टाईप ६ ते टाईप ८ पर्यंतचे सरकारी बंगले दिले जातात. कोणत्या खासदाराला कोणता बंगला द्यायचा याचा निर्णय त्यांच्या ज्येष्ठतेवर अवलंबून असतो. खासदारांनी राजीनामा दिल्यास त्यांना ३० दिवसांत सरकारी बंगला सोडावा लागतो. ३० दिवसांनंतरही ते बंगल्यात राहू शकतात. पण त्यासाठी त्यांना बाजारभावाप्रमाणे भाडं द्यावं लागतं.

Share This Article