जागावाटपात आमच्या नेत्यांनी कडक भूमिका घेणं गरजेचं होतं

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 8 Views 3 Min Read
3 Min Read
Highlights
  • नानांचं नाव न घेता वर्षा गायकवाडांची परखड टीका

मुंबई :  महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटमध्ये काँग्रेस (Congress) नाराज आहे. मात्र विशेष म्हणजे मुंबई काँग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवा वाद सुरू झाला आहे.  मुंबईच्या जागावाटप करताना मुंबई अध्यक्षांना न बोलावल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळते. यासंदर्भात  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दिल्लीत तक्रार केलेली आहे, त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली. मुंबईच्या जागावाटपात मला विश्वासात घेतलं नाही, अशी खंत वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  यांनी आज व्यक्त केली आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

- Advertisement -

वर्षा गायकवाड म्हणाल्या,  मुंबईमध्ये मागील काळात आम्ही पाच जागा लढायचो आणि राष्ट्रवादी एक सीट लढायची. सध्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही देखली समान सहभागी आहे. जागावाटपानंतर  मी काही प्रमाणात नाराज आहे.  यासंदर्भात मी पक्ष श्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांना देखील सांगितलं आहे . आम्हाल कमीत कमी दोन ते तीन जागा मिळाव्यात.  आमचा काहीही निर्णय असेल तो पक्ष श्रेष्ठींना कळवू . पक्षात कार्यकर्त्यांची काही अपेक्षा असतात. पक्षाने काही निर्णय घेतल्यानंतर त्या स्विकाराव्या लागतात.

- Advertisement -

मुंबईच्या काही जागेवर आणखी काही चांगले होऊ शकते : वर्षा गायकवाड

मुंबई काँग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवा वाद सुरू झालाय. याविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या,मुंबई आणि प्रदेश दोन वेगळ्या भुमिका आहे  मुंबईचे अस्तित्व वेगळे आहे.⁠माझ्या वरिष्ठ नेत्यांना ही आम्ही सांगितलं होते. चर्चा करत असताना संघटना म्हणून आम्हाला अपेक्षा होती  महाराष्ट्र प्रदेशने कठोर भुमिका मांडायला हवी होती. पक्ष श्रेष्ठींकडे आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे . त्यामुळे आमच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे होते. मुंबईच्या काही जागेवर आणखी काही चांगले होऊ शकते.  दक्षिण मध्य मुंबई मिळावा अशी भुमिका आहे.  ⁠ही निवडणूक महत्वाची आहे.  आम्ही आमची भुमिका पक्षाकडे मांडू.

- Advertisement -

आम्ही  वस्तुस्थिती हायकमांडला सांगणार : वर्षा गायकवाड

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली आहे. याविषयी बोलताना वर्षा गायकवड म्हणाल्या, घोसाळकर यांचे काही लोक मला भेटून गेले.  ⁠दक्षिण मध्य मुंबईत आमची ताकद आहे. जागा आदला बदल केली तर आम्ही स्वागत करु. ⁠मी किती बैठकांना उपस्थित होते हे सर्वांना माहीत आहे. मुंबई जागा वाटपासंदर्भात  आणखी काही चांगल करता आलं असते.  पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे. मात्र आम्ही ही वस्तुस्थिती हायकमांडला सांगणार आहे.

महायुतीने त्यांच्या जागा वाटपाचा प्रश्न पहिला मिटवावा : वर्षा गायकवाड

महायुतीकडून महाविकास आघाडीच्या जागावाटपावर टीका करण्यात आली आहे. त्याविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, महायुतीने त्यांच्या जागा वाटपाचा प्रश्न अजून सुटला नाही.  ⁠त्यांनी हा वाद पहिला मिटवावा.

Share This Article