एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी ITची छापेमारी

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 49 Views 1 Min Read
1 Min Read

मुंबई : मुंबई अंडरवर्ल्डमधील शेकडो गुन्हेगारांचा खात्मा करून देशभर प्रसिद्धीच्या झोतात आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचं वृत्त आहे. मुंबईतील अंधेरी इथल्या त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये आयकर विभागाची कारवाई सुरू असल्याचं कळतंय.

- Advertisement -

अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.

- Advertisement -

प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील निवासस्थानी आज दुपारी आयकर विभागाचं पथक पोहोचलं. आमदारासंबंधी एका प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू असल्याची प्राथमिक माहिती कळते आहे. अजूनही ही कारवाई सुरू असल्याचं कळतं आहे.

- Advertisement -

Share This Article