केरळमध्ये गेल्या २४ तासात ३ जणांचा मृत्यू तर २९२ कोरोनाबाधितांची नोंद

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 13 Views 1 Min Read
1 Min Read

केरळ राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे  रुग्णवाढ होताना दिसत आहे. मंगळवारी, १९ डिसेंबर रोजी  २९२ कोविडबाधितांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये २०४१  कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच एकाच दिवसात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरसआणि कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट  भारतात  आल्याचं समोर आलं आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये आढळून आलं आहे.  JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले.

- Advertisement -

भारतात कोविड-19 च्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला बाधित 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवले गेले. यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले होते. इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) च्या जिल्हा-आधारित प्रकरणांची तपासणी आणि प्रकरणे लवकर शोधण्यासाठी सर्व आरोग्य सुविधांबाबत नियमितपणे अहवाल देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य खात्याने दिले आहेत.

- Advertisement -

Share This Article