चंद्रपुरात 23 शाळकरी मुलींना तासभर डांबले स्वच्छतागृहात

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 19 Views 1 Min Read
1 Min Read

- Advertisement -
चंद्रपूर शहरातील नटराज इंग्लिश स्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट न लावल्याने 23 शाळकरी मुलींनातासभर स्वच्छतागृहात डांबल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर त्यांची सुटका झाल्यानंतर काही मुलींना अस्वस्थ, मळमळ, उलट्या झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरकार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

चंद्रपूर शहरात अष्टभुजा प्रभागात नटराज इंग्रजी शाळा आहे. यामध्ये शहरातील ठिकठिकाणच्या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. 3 नोव्हेंबरला शाळकरी मुलींनी सॅनिटरी नॅपकीनचा वापर केल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावत नाही. या कारणासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरकार यांनी अत्यंत निर्दयीपणे सातवी ते दहावीमधील 23 शाळकरी विद्यार्थिनींना शिक्षा म्हणून पूर्ण तासभर बाथरूममध्ये बंद केले. क्रूरता आणि निष्काळजीपणाच्या या कृत्यामुळे मुलींना तीव्र त्रास सहन करावा लागला. मुलींना स्वच्छतागृहातून बाहेर काढल्यानंतर काही मुलींना अस्वस्थ वाटू लागले. काहींना मळमळ होवून उलट्या देखील झाल्या.

- Advertisement -

ही घटना मुलींनी शिक्षकांना सांगितली, तेव्हा त्यांना समर्थन आणि सहानुभूतीऐवजी हास्य आणि उपहासात्मक वागणूक मिळाली. त्यानंतर मुलींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. सदर घटनेची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि युवती जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करत शाळेला भेट देऊन या लज्जास्पद कृत्याचा जाब विचारला.

- Advertisement -

Share This Article