दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटांचा जास्त वेळ

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 19 Views 2 Min Read
2 Min Read

पुणे : दहावी   आणि बारावी बोर्ड परीक्षा  देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये  परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा देणाऱ्या  परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

- Advertisement -

दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते.  परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल इाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत  पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात येत आहे.

- Advertisement -

सकाळ सत्रात स. 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक

फेब्रुवारी-मार्च 2024  परीक्षांचा वेळी ही सकाळ सत्रात सकाळी 11.00  वाजता तसेच दुपार सत्रात दु.3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 2.30  वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे

- Advertisement -

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येणार (HSC- SSC Exam Schedule) 

परीक्षेचा सध्याचा वेळ

परीक्षेची सुधारीत वेळ

 सकाळी 11 ते दुपारी 2 

सकाळी 11 ते दुपारी 2:10

 सकाळी 11 ते दुपारी 1

 सकाळी 11 ते 1:10 

सकाळी 11 ते दुपारी 1.30

सकाळी 11 ते दुपारी 1.40

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे.  फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणा आहे.

Share This Article