मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवून उपभोगाची वस्तू समजली; रामदास तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 42 Views 2 Min Read
2 Min Read

नागपूर : वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. या लढतीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यांच्या विरोधात त्यांच्या स्नुषा पुजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशातच आज पुजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकाप परिषदेत पुजा तडसंही उपस्थित होत्या. याच पत्रकार परिषदेत बोलताना पुजा तडस यांनी संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

रामदास तडस यांच्या सुश्ना पूजा तडस म्हणाल्या की, “मला मुल झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की, हे बाळ कोणाचं? या बाळाची डीएनए टेस्क करा, असं बोलण्यात आलं. मला रॉडनंही मारण्यात आलं, मोदीजी 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहे. मी पंतप्रधान मोदींना एक विनंत करते की, माझ्या मुलाला न्याय द्या. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्या आणि त्यांना मला न्याय द्यावा.”

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंसोबत वर्ध्यातील भाजपचे लोकसभा उमेदवार रामदास तडस यांच्या स्नुषा पुजा तडसही उपस्थित होत्या. या पत्रकार परिषदेत बोलताना पुजा तडस यांनी तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे, सुषमा अंधारे या रामदास तडस यांच्या स्नुषा पुजा तडस यांना घेऊन पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या.

- Advertisement -

Share This Article