मी देखील आता सर्व उघड करतो, SIT चौकशीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 35 Views 1 Min Read
1 Min Read

मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात देखील गाजताना पाहायला मिळत असून, आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, यावर मनोज जरांगे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “देवेंद्र फडणवीस  हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच चुकीचं नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “मी मराठ्यांचे काम करतोय.  ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. आता म्हणाले  तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे म्हणाले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article