अमरावतीत खासगी बस अन् काँक्रिट मिक्सरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 9 Views 1 Min Read
1 Min Read

अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात भीषण अपघातानं झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर ट्रॅव्हल्स आणि रेडी मिक्स काँक्रिट मिक्सरचा अपघात झाला या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेनं अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्थानिकांनी गर्दी केली होती.

- Advertisement -

यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी 14 तरुण अमरावतीवरून यवतमाळसाठी मिनी बसमधून निघाले होते. त्यांची बस नांदगाव खंडेश्वरजवळ असणाऱ्या शिंगणापूर गावाजवळ होती. त्यावेळी सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बसमध्ये अपघात झाला. मिनी बसमध्ये बसलेल्या चौघ तरुणांचा मृत्यू झाला. तसेच दहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे. नांदगाव खंडेश्वर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

Share This Article