हिमायतनगरात ‘ऑनर किलिंग’; शवविच्छेदनातुन मुलीचा खून झाल्याचे उघड, आई-वडिलांवर ३०२ चा गुन्हा दाखल

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 22 Views 3 Min Read
3 Min Read

नांदेड/हिमायतनगर। प्रेमसंबंध प्रस्थापित करून इच्छेविरुद्ध लग्न करण्याचा अट्टाहास धरणाऱ्या आपल्या १७ वर्षीय पोटच्या मुलीची जन्मदात्या आई- वडिलांनी कोयत्याने वार करून हत्या केली. ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात दि.२ फेब्रुवारी रोजी उघड झाली आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला असून, याबाबत हिमायतनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कु. अंकिता रामराव पवार, वय 17 वर्ष असे खून झालेल्या मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व  धर्माबादचे उपविभागीय अधिकारी व भोकर पोलीस तळ ठोकून आहेत.

- Advertisement -

याबाबत हिमायतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात अल्पभूधारक शेतकरी पवार कुटुंब राहते आहे. शा हलाकीच्या परिस्थितीतही त्यांनी तीन मुलींचे लग्न लावून दिले होते. या कुटुंबातील घरी असलेल्या मुलिचे सूत परिसरातील एका युवकाशी जुळले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी मुलीस समजाऊन सांगून इतर जातीच्या मुलासोबत प्रेम करण चुकीचे आहे असा समज दिला होता. तरीदेखील मागील महिन्याभरापूर्वी ती प्रेम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती. तेंव्हा घरच्यांनी पळून नेणाऱ्या विरोधात हिमायतनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोस्को अंतर्गत प्रेम करणाऱ्या युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर स्थागुशाच्या पथकाने मुलीला समजुन आई वडिलांच्या स्वाधीन केले होते. मात्र मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही, पुन्हा देखील ती पळून गेलेल्या त्या मुलासोबत लग्न करतो असा अट्टहास करत होती.

- Advertisement -

त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी तिच्या वागण्याला कंटाळून, मुलगा अन्य जातीचा असल्याने समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने मयत कु.अंकिता ही शुक्रवारी मध्यरात्री गाढ झोपेत असतांना विळ्याने सपासप डोक्यावर, कपाळावर वार करून तिला यमसदनी धाडले आहे. खून झाल्यानंतर मुलीला येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल करून मयत अंकिताच्या खुनाला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु, डॉक्टरांना संशय आल्याने शवविच्छेदन करण्यात निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलिसांनी खाक्या दाखविताच मुलीच्या आई-वडिलांनीच तिला मारल्याची कबुली दिली असल्याने कलम 302 अंतर्गत आरोपी पंचफुलाबाई रामराव पवार, आणि रामराव पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा हात आहे का..? याचा तपास पोलीस करत आहेत. 

- Advertisement -

सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी करत आहेत. दरम्यान धर्माबादचे उपविभागीय अधिकारी श्री संपते सर व पीएसआय पाटील भोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असून, वृत्त लिहिपर्यंत वरिष्ठ अधिकारी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. तर या गुन्ह्यात तपास कामी स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पीएसआय मुंडे मैसनवाड, सुरेश घुगे, तानाजी येळगे, शंकर केंद्रे यांनी देखील कामगिरी केली आहे.

ही घटना १ फेब्रुवारी रोजी घडली. मात्र, खून लपविण्यासाठी सुरुवातीला या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात शंका निर्माण झाल्याने पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मुलीच्या डोक्याला व ठिकठिकाणी गंभीर मारहाण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवशंकर बुरकुले यांनी प्राथमिक माहितीत पोलिसांना सांगितले. त्यानंतर या प्रकरणी आरोपी वडील रामराव मारोती पवार, आई पंचफुला रामराव पवार या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच या खुनाचा घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरून गेला आहे.

Share This Article