रेणापुरात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 29 Views 2 Min Read
2 Min Read

पाचोरा जि.जळगांव येथील पत्रकार संदिप महाजन यांना विरोधात बातमी का छापली म्हणून आमदार किशोर पाटील यांच्या गुंडानी जिवघेणा हल्ला केला याचा निषेध म्हणून रेणापूर तालुक्यातील पत्रकारच्या वतीने सोमवारी ( दि. २ १ ) तहसीलदारांना निवेदन देत महाराष्ट्र शासनाने केलेल्या कुचकामी पत्रकार सरंक्षण कायद्याच्या पत्रकाची होळी केली.

- Advertisement -

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधले जाते परंतु आज त्याच चौथ्या स्तंभाचे काम करणा-या पत्रकारांवर महाराष्ट्रात दिवसेंदिवस हल्ले केले जात आहेत. असाच प्रकार पाचोरा जि.जळगांव येथील पत्रकार संदिप महाजन यांच्याबाबत घडला. विरोधात बातमी का छापली म्हणून आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केली आणि त्यानंतर पत्रकार संदिप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या गुंडानी चौकात गाडी आडवून आमाणूषपणे बेदम मारहाण केली. यात महाजन हे गंभीर जखमी झाले ही घटना अतिशय ंिनदनीय असून या हल्याचा रेणापूर तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदविला असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांच्या वतीने तहसीलदारांंना देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनानंतर पत्रकारांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कुचकामी पत्रकार सरंक्षण कायद्याची सार्वजनिक होळी केली असून पत्रकार सरंक्षण कायद्याची कडक आमंलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी चंद्रकांत कातळे, रफीक शेख-शिकलकर,बालाजी कटके, सिध्दार्थ चव्हाण, सुधाकर दहिफळे, नामदेव शिंदे, ईश्वर बद्दर, तुकाराम जोगदंड, बळीय्या स्वामी, कोंडीराम काळे, शिवाजी यमते, उदय कुमार पाठक, संतोष तुरूप, भरत भोसले, विष्णू आचार्य, अनिल फुलारी, वसंत सूर्यवंशी, आर. डि. अपंिसगेकर, सतीश जाधव, मधुकर गालफाडे आदी पत्रकार उपस्थित होते.

- Advertisement -

Share This Article