अर्शदीप सिंगने रचला इतिहास

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 15 Views 2 Min Read
2 Min Read

जोहान्सबर्ग : अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गुडघे टेकावे लागले. पण या नेत्रदीपक कामगिरीसह आता अर्शदीपने इतिहास रचला आहे. कारण अर्शदीपसारखी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

- Advertisement -

अर्शदीप सिंगचा हा चौथा वनडे सामना होता, पण त्याला यापूर्वी एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण अर्शदीपने ही सर्व कसर यावेळी भरून काढली. कारण अर्शदीपने या सामन्यात पाच विकेट्स मिळवत भारताच्या विजयाचा पाया रचला. आतापर्यंत टी-२० सामन्यात अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली होती. पण या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्शदीपने पाच बळी मिळवले आणि इतिहास रचला. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट्स मिळवता आले नव्हते. पण अर्शदीपने ही किमया आपल्या चौथ्याच वनडे सामन्यात करून दाखवली आहे.

- Advertisement -

अर्शदीपला यावेळी अवेश खानची चांगली साथ मिळाली. कारण अवेश खानने चार बळी मइळवत अर्शदीपला चांगली साथ दिली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या ९ फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या वनडे सामन्यात ११६ धावांवर ऑल आऊट करता आले. दक्षिण आफ्रिकेने यावेळी टॉस जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय किती चुकीचा होता हे अर्शदीपने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दाखवून दिले.

- Advertisement -

अर्शदीपने आपल्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. अर्शदीप या सामन्यात हॅट्रीकवरही होता. कारण सलग दोन चेंडूंमध्ये त्याने विकेट्स मिळवल्या होत्या. पण यावेळी अर्शदीपला हॅट्रीक मिळवता आली नाही. पण हॅट्रीक मिळाली नसली तर अर्शदीपने यावेळी पाच विकेट्स मिळवल्या आणि भारतासाठी विजयाचा पाया रचला. त्यामुळे अर्शदीपने आपले काम चोख बजावले आहे. आता फलंदाज कशी कामगिरी करतात यावर भारताचा विजय अवलंबून असेल.

Share This Article