भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 4 Views 1 Min Read
1 Min Read

मुंबईतील भाईंदर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या भाईंदर येथील झोपडपट्टी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. भाईंदर आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. भाईंदर पूर्वेकडील  गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत आग लागली आहे. आज सकाळी ही अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीत काही जण जखमी झाल्याची  माहीती मिळत आहे.

- Advertisement -

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मीरा-भाईंदर परिसरात लागलेली आग अतिशय भीषण असून अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. आगीतून बाहेर पडणारा काळा धूर परिसरात पसरला आहे.

- Advertisement -

भाईंदरच्या आझाद नगर भागात अग्नितांडव सुरु आहे. महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. मुंबई, ठाणे आणि वसई महानगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रे मागवण्यात आली आहेत, यावरून आगीची भीषणता समोर येत आहे.

- Advertisement -

भाईंदर पूर्वच्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात असणाऱ्या आझाद नगर झोपडपट्टीला सकाळी 4.30 वाजता आग लागली. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आयुक्त संजय काटकर यांनी सांगितलं आहे. मात्र, एक अग्निशमक कर्मचारी जखमी झाला आहे. एकूण 24 अग्निशमक वाहन आग विझवण्याचं काम करत आहेत. अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Share This Article