औसा येथे कृषीमंत्र्यांच्या प्रतिमेस काद्यांचा हार अर्पण

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 27 Views 2 Min Read
2 Min Read

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औशात कृषीमंर्त्याच्या प्रतिमेस ‘कांद्याचा हार’ घालून निषेध करण्यात आला . केंद्र सरकारने परवा कांद्याचे दर वाढल्याचा गवगवा करीत दर आटोक्यात ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे, केंद्र सरकारने हा घेतलला निर्णय अत्यंत चुकीचा असून कांद्याच्या दरावर परिणाम करणारा व कांदा उत्पादक शेतक-यावर अन्याय करणारा आणि शेतक-यांना उदध्वस्त करणारा आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याचे उत्पादन ब-यापैकी झाल्यावर कांद्याचे दर गडगडल्याने शेतक-शसंनी पिकवलेला कांदा मातीमोल भावात विकावा लागला तर काही शेतक-यांवर हाच कांदा रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली.

- Advertisement -

गेल्या हंगामात शेतक-यानी लावलेला कांदा अतिवृष्टीने वाया गेला अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतक-याना शासनाने त्यावेळी मदत जाहीर केली होती परंतु ती मदत अद्यापही शेतक-याांना मिळालेली नाही. त्यातच केंद्र सरकारने चुकीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत तेव्हा शासनाने कांदा निर्यातीवर लावलेला ४० टक्के निर्यात शुल्काचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणी करिता व निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा लातूरच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर सोमवार दि २१ ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेस ‘कांद्याचे हार घालून निषेध आंदोलन’ करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार,विधानसभा संघटक महेश बनसोडे,तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने,तालुका सचिव प्रकाश भोंग,कृषीचे तालुकाध्यक्ष गोंिवद चव्हाण, सतीश जंगले,अमोल थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article