नाशिकमधून इसिसला फंडिंग; तिडके कॉलनीतून तरुणाला अटक

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 2 Min Read
2 Min Read

नाशिक : ‘इसिस’च्या युद्धात (इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट) मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातलगांच्या उदरनिर्वाहासाठी संकलित होणाऱ्या पैशांमध्ये नाशिकमधूनही ‘मनी ट्रेल’ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीरियातील एका महिलेला ‘इसिस’साठी २०१९पासून फंडिंग करणाऱ्या शहरातील संशयिताला दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) तिडके कॉलनीतून अटक केली आहे. हुसैफ अब्दुल अजीज शेख (वय ३०, रा. एमराल्ड रेसिडेन्सी, तिडके कॉलनी, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

‘एटीएस’च्या नाशिक युनिटने शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या तिडके कॉलनी भागात ही कारवाई केली. शहरात पहिल्यांदाच थेट दहशतवादी संघटनांशी संबंधित तरुणाला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

‘बॅटल ऑफ बाबूस’

सिसमार्फत सन २०१९ मध्ये झालेल्या कारवायांमध्ये ‘बॅटल ऑफ बाबूस’ असे युद्ध झाल्याची माहिती ‘एटीएस’कडे आहे. या कारवाईत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातलगांना आर्थिक मदतीसाठी इसिसमार्फत निधी संकलित केला जातो. त्यासाठी संशयिताला हेरण्यात आले. त्याच्याशी सोशल मीडियावरुन चॅटिंग करून निधी संकलित करण्यात आल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

- Advertisement -

एटीएस तपासातून उघड बाबी

  1.  अटकेपूर्वी तीन दिवस कसून चौकशी
  2.  व्हॉटसॲप चॅटिंगद्वारे संशयिताची संबंधित महिलेशी ओळख
  3.  चॅटिंगमध्ये सावध चर्चा; मेसेज व आर्थिक व्यवहारांचे पुरावे सादर
  4.  सात मोबाइल हस्तगत; त्यापैकी चार सुरू, तीन बंद
  5.  तीन सिमकार्ड, एक पेनड्राइव्ह, एक लॅपटॉप, पासपोर्ट जप्त
  6.  एसबीआय, पंजाब नॅशनल, फेडरल, ॲक्सिस, आयसीआयसीआय बँकेत खाते
  7. श्रीलंका, दुबई, चेरा, तेहरान येथे आरोपीचा प्रवास

Share This Article