बहिणीसाठी भावाने बाह्या सरसावल्या; धनुभाऊ म्हणतात पंकजाचा ऐतिहासिक मतांनी विजय होणार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 55 Views 2 Min Read
2 Min Read

बीड : बीड लोकसभा मतदारसंघासाठी (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंकजा मुंडेच्या मागे धनजंय मुंडे खंबीरपणे उभे  आहेत. पंकजा मुंडेंचा विजय निश्चित असून  निवडणुकीत  ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचेधनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना लोकसभेत विजय करण्यासाठी आज महायुतीच्या सर्वच आमदार माजी आमदार आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासह शिवसेना आणि इतर मित्र पक्षाचे सर्वच मोठे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर ते बोलत होते.

- Advertisement -

धनंजय मुडे म्हणाले, विरोधात लढलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने पंकजा मुंडे ऐतिहासिक मताने विजयी होतील. यापूर्वी विरोधात असलेले सर्व लोकप्रतिनिधी आता एकत्र आल्याने पंकजा मुंडे या ऐतिहासिक मताने विजय होणार आहे.  बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप  या दोन पक्षांमध्येच लढत व्हायची आणि आता राष्ट्रवादी भाजपसोबत आल्याने बीड जिल्ह्यात महायुतीची मोठी ताकद वाढली आहे.  महायुतीची आता ऐतिहासिक अशी एकजूट झाली असून शिवसेना आणि मनसेसह अनेक मित्रपक्ष आमच्या सोबत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित होईल

- Advertisement -

बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना बीडच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली.  या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले,  बजरंग सोनवणे यांना अनेक वेळा संधी दिली त्यांनी काय विकास केला याचा हिशोब द्यावा. बजरंग सोनवणे यांना अनेक वेळा आम्ही संधी दिली आणि तेव्हा त्यांनी काय विकास काम केली याचा हिशोब अगोदर द्यावा आणि नंतर बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं.

- Advertisement -

बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात लढलेले लोकप्रतिनिधी हे महायुतीमध्ये एकत्र आले आहेत.  त्यामुळे हे लोकप्रतिनिधी येणाऱ्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देतील असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तर पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी घेतलेल्या बैठकीला राष्ट्रवादी शिवसेना मनसे यासह इतर मित्र पक्षाचे आजी माजी आमदार उपस्थित होते.  त्यांनी देखील पंकजा मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करून संसदेत पाठवणार असल्याचे सांगितले आहे. तर काही आमदारांनी पंकजा मुंडे यांचा प्रचार आपापल्या मतदारसंघात सुरू केला असून पंकजा मुंडे या उमेदवार असल्याने लोकांमध्ये देखील उत्साह असल्याचे या आमदारांनी सांगितलं.

Share This Article