पुण्यात महाबळेश्वरचा फिल, नाशिकमध्ये मनालीसारखं वातावरण

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 10 Views 4 Min Read
4 Min Read

जानेवारीच्या उत्तरार्धात राज्यात तापमान कमालीचे घसरले असून दिवसाही कमालीचा गारवा  असल्याने सर्वत्र हुडहुडी पसरली आहे. पुण्यात गारवा प्रचंड वाढला असून पुणेकर महाबळेश्वरसाखं वातावऱण अनुभवत आहेत. नाशिकमधील निफाडचं तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवलं गेलेय. राज्यात अनेक ठिकाणाचं तापमान 0 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेय. त्यामुळे कपाटात ठेवलेले स्वेटर लोकांनी पुन्हा एकदा बाहेर काढले. शेकोट्या पेटवल्या जात आहेत. पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पुण्याचा पारा 8.6 अंश सेल्सियसवर घसरला. तर नाशिकच्या निफाडमध्ये 4.4 तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रुजमधील किमान तापमान 17.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यात 20 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

- Advertisement -

पुण्यात महाबळेश्वरचा फिल – 

पुण्यामध्ये यंदाच्या वर्षातील निचांकी तांपनाची नोंद झाली आहे. पुण्याचं तापमान 8.6 अंश सेल्सियसवर घसरले आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे शहराच्या तापमान सातत्याने घट होत आहे. पुण्यातील अनेक ठिकाणावरील तापमान  10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. ग्रामीण भागासह शहरीभागातही शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

- Advertisement -

नाशिकमध्ये हुडहुडी –

जानेवारीच्या उत्तरार्धात नाशिक शहरात तापमान कमालीचे घसरले असून दिवसाही कमालीचा गारवा असल्याने सर्वत्र हुडहुडी पसरली आहे. नाशिकमध्ये मागील तीन दिवसांपासून पारा घसरला आहे. निफाडमध्ये 4.4 या नीच्चांकी तापमानाची नोंद तर नाशिकचा पारा 8.6 अंशावर घसरलाय.

- Advertisement -

निफाडमध्ये मंगळवारी 6.6 , बुधवारी 5.6 आणि आज 4.4 तपमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये मंगळवारी 10.1, बुधवारी 9.0 तर आज 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

परभणी जिल्हा गारठला, तापमान 7.5 अंशावर 

मागच्या तीन दिवसांपासून परभणी  जिल्हा पुन्हा एकदा गारठला असून आज तापमान हे 7.5 अंशावर आले आहे.यंदाच्या मौसमातील हे सर्वात नीचांकी तापमान असुन यामुळे जिल्हाभरात थंडीचा कडाका वाढलाय. तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान घसरल्याने सर्वत्र प्रचंड गारवा जाणवत आहे. पुन्हा एकदा ग्रामीण भागात शेकोटी पेटत असून उबदार कपड्यांचा वापर केला जातोय महत्त्वाचा म्हणजे रब्बी पिकांसाठी ही थंडी पोषक आहे.

धुळे 4.6 अंश सेल्सिअस – 

धुळे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील तापमानाचा पारा 4.6 अंश सेल्सिअसवर स्थिर असून जिल्ह्यात प्रचंड गारठा वाढला आहे..थंडी पासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटल्या असून रात्रीच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कडाक्याची थंडी वाढली असून पुढील आठवडाभर ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांनी काळजी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान 10 अंशावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरल्यामुळे जिल्ह्यात गारठा वाढला आहे. गेले चार पाच दिवस जिल्ह्यात ही स्थिती आहे. थंडी वाढल्यामुळे आंबा, काजूला फायदा होणार आहे. जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढताच ठिकठिकाणी शेकोटी पेटविल्या दिसत आहेत. तर जिल्हयात सर्वत्र पहाटे धुक देखील पसरलेले आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपड्यांचा आणि शेकोटीचा आधार नागरिक घेताना दिसत आहेत.

भंडाऱ्यात हुडहुडी वाढल्यानं नागरिकांनी घेतला शेकोटीच्या आधार….

भंडारा जिल्ह्यात 22 जानेवारीच्या रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळं तापमानात घट होऊन हुडहुडी वाढली आहे. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं तापमानात बरीच घट झाली आहे. बुधवारी संपूर्ण दिवस आणि रात्री भंडारावासियांना हुडहुडीनं चांगलचं हैराण केलं. हुडहुडी भरणाऱ्या थंडीमुळं नागरिकांनी कपाटात ठेवलेली उबदार कपडे बाहेर काढलीत. काल रात्री आणि आज पहाटेपासून नागरिकांनी शेकोटी पेटवून थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारीही थंडीची लाट कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आकाश ढगाळलेलं राहणार असल्यानं थंडीचा जोर कायम राहणार आहे.

Share This Article