दिव्यांग मुलाकडून वडिलांचा खून

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 9 Views 1 Min Read
1 Min Read

पिंपरी: क्षुल्लक कारणावरून आपल्या वडिलासोबत झालेल्या भांडणात दिव्यांग मुलाने वडिलांच्या  डोक्यात अवजड वस्तूने मारून त्यांचा खून केल्याची घटना गुरुवारी (३० नोव्हेंबर) सकाळी खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे घडली. खंडू लांडे (रा. दौंडकरवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

या प्रकरणी खंडू यांचा मोठा मुलगा बाबाजी खंडू लांडे (वय ३५) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू यांचा लहान मुलगा नितीन खंडू लांडे (वय ३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन लांडे याने वडील खंडू यांच्याशी घरातील किरकोळ कारणावरून वाद घातला. त्यातून वडिलांच्या डोक्यात अवजड वस्तूने मारून त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार फिर्यादी यांच्या चुलत भावाने पाहिला आणि त्याबाबत फिर्यादींना फोनवरून माहिती दिली. फिर्यादी कामानिमित्त बाहेर असताना हा प्रकार घडला.

- Advertisement -

दरम्यान, खंडू यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यानुसार त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास खंडू यांचा मृत्यू झाला. आरोपी मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

Share This Article