समृद्धी महामार्गावर कंटेनर-स्विफ्टचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 17 Views 1 Min Read
1 Min Read

अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. समृद्धी महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली. या भीषण अपघात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत.

- Advertisement -

जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा तीन जणांचा मृत्यू झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article