फक्त 40 दिवस जगणार बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 72 Views 2 Min Read
2 Min Read

बॉलिवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बॉलिवूडचा एकप्रसिद्ध अभिनेता सध्या मृत्यूच्या दारात आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याची शेवटची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याकडे फक्त शेवटचे 40 दिवस शिल्लक आहेत. म्हणून अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता ‘ ब्रह्माचारी’ फेम अभिनेता ज्युनियर महमूद आहेत. ज्युनियर महमूद गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज लढत आहेत.

- Advertisement -

ज्युनियर महमूद याचं वय 67 वर्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्युनियर महमूद आणि विनोदवीर जॉनी लिव्हर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जॉनी लिव्हर, ज्युनियर महमूद यांची विचारपूस करताना दिसत आहेत. उपचारासाठी आर्थिक मदत देखील केल्याची माहिती समोर येत आहे. आता ज्युनियर महमूद यांची भेट घेण्यासाठी मास्टर राजू देखील त्यांच्या घरी गेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मास्टर राजू यांनी ज्युनियर महमूद यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ज्युनियर महमूद यांना पाहिल्यानंतर मास्टर राजू भावुक झाल्याचं चित्र दिसत आहे. ज्युनियर महमूद यांच्यासोबत फोटो पोस्ट करत मास्टर राजू याने कॅप्शनमध्ये, ‘यांना पोटोचा कर्करोग आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा…’ असं लिहिलं आहे.

ज्युनियर महमूद गेल्या काही दिवसांपासून बिछान्याला खिळले आहेत. त्यांचं जवळपास 20 किलो वजन कमी झाल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. ज्युनियर महमूद यांचे घरीच उपचार सुरु असून, त्यांची पत्नी आणि मुलं अभिनेत्याची काळजी घेत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

ज्युनियर महमूद यांचे सिनेमे

ज्युनियर महमूद यांचं खरं नाव नईम सैयद अस आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव बदललं. ज्युनियर महमूद यांनी विविध भाषांमध्ये तब्बल 200 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ज्युनियर महमूद यांनी ब्रह्मचारी (1968), मेरा नाम जोकर (1970), परवरिश (1977), आणि दो और दो पांच (1980) यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ज्युनियर महमूद यांच्याकडे फक्त 40 दिवस शिल्लक आहेत.

Share This Article