संभाजीनगरात कोरोनाची एन्ट्री

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 18 Views 1 Min Read
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असतांना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात चार वर्षीय चिमुकलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये राहणा-या एका चार वर्षीय मुलीला कोरोना झाल्याने आता तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. एका खाजगी रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे या मुलीच्या पालकाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

- Advertisement -

मागील वर्षभरापासून जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोना हद्दपार झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र, शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागातील अचानक एका चिमुकलीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे याची माहिती रुग्णालयाकडून तातडीने महानगरपालिका आरोग्य विभागाला देण्यात आली. वर्षभरानंतर शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने मनपा आरोग्य यंत्रणाही हादरली आहे. आगामी सणासुदीचा काळ पाहता आणि होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाकडून त्यादृष्टीने पाऊले उचलल्या जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

Share This Article