समुद्रकिनारी सापडले कोट्यवधींचे ड्र्ग्ज

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 37 Views 3 Min Read
3 Min Read

महाराष्ट्राच्या पश्चिम टोकाला समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले. त्यामुळे खळबळ उडाली. हे ड्रग्स समुद्राच्या लाटांनी तरंगणा-या पॅकेट्सच्या स्वरूपात किना-यावर आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील ७ वेगवेगळ््या किना-यांवरून सीमाशुल्क विभागाने २५० किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले. ड्रग्सचे प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकेट्स १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्टदरम्यान राज्याच्या वेगवेगळ््या किना-यांवर वाहून आले. कर्डे, लाडघर, केळशी, कोलथरे, मुरुड, बुरुंडी, दाभोळ आणि बोर्या समुद्रकिना-यांवर ही ड्रग्सची पाकिटे जप्त करण्यात आली. ही पॉकिटे अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून आली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील वेगवेगळ््या समुद्रकिना-यांवर वाहून आलेली ड्रग्सची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, असा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. ही अंमली पदार्थांची पाकिटे एक तर समुद्रात पडली असतील किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या उद्देशाने परदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशयही सीमाशुल्क विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा गस्तीदरम्यान रत्नागिरीतील दापोली सीमाशुल्क विभागाच्या तटरक्षक दलाला कर्डे समुद्रकिनारी वाहून आलेले १० संशयास्पद पॅकेट्स (एकूण १२ किलो वजन) आढळून आली. ही ड्रग्जची पाकिटे सीमाशुल्क विभागाने तात्काळ ताब्यात घेतली आणि त्यांची तपासणी केली. तपासाअंती चरस (हशीश) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर केळशी ते बोर्या परिसरात सीमाशुल्क विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात आली.

१५ ऑगस्ट रोजी कर्डे ते लाडघर समुद्रकिनारी सुमारे ३५ किलो चरस असलेली प्लास्टिकची पाकिटे आढळून आली. १६ ऑगस्ट रोजी केळशी समुद्रकिना-यावरून २५ किलो आणि कोलथरे समुद्रकिना-यावरून १३ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी मुरुड येथून १४ किलोंपेक्षा जास्त, बुरुंडी ते दाभोळ खाडीदरम्यान १०१ किलो तर बोर्या येथून २२ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. नंतर कोलथरे समुद्रकिना-याच्या खडकाळ भागातही मोठ्या प्रमाणात चरस असलेली पाकिटे आढळून आली.

या संदर्भात दापोली सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कुडाळकर यांनी सांगितले की, आमची शोध मोहीम सुरू आहे. तरीही समुद्रकिनारी राहणा-या स्थानिक लोकांना अशी कोणतीही पाकिटे आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणा-यास १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुजरात समुद्र किनारीही आढळले अंमली पदार्थ

गेल्या वर्षी २०२२ मध्ये गुजरातमधील पोरबंदर आणि जुनागढ जिल्ह्यात समुद्र किना-यालगतच्या भागातही ड्रग्जचे पॅकेट्स वाहून आल्याचे पाहायला मिळाले. तब्बल ५९ प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक केलेले ड्रग्ज किना-यावर आढळून आले होते. प्रत्येक पॅकेटचे वजन सुमारे एक किलो होते. जुनागडमधील मंगरोळ आणि पोरबंदरमधील माधवपूर येथून ड्रग्ज पाकिटे जप्त करण्यात आली होती.

२०१९ मध्ये आढळली होती पॉकिटे

२०१९ मध्ये सीमा सुरक्षा दलाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील क्रीक भागांत समुद्र किना-यावर ड्रग्जची दोन पाकिटे आढळून आली होती. या दोन्ही पॅकेटचे वजन सुमारे २ किलो असल्याचे अधिका-यांनी सांगितले होते. ही दोन ड्रग पॅकेट्स पाकिस्तानी क्रूने समुद्रात टाकलेल्या मोठ्या प्रतिबंधित ड्रग्सच्या कन्साइनमेंटचा भाग होती, असे सांगण्यात आले. आताही असेच पॉकेट टाकण्यात आले असावे, असे सांगितले जात आहे.

Share This Article