दोन दिवस जेवण करु नका, आई वडिलांना मतदान कुणाला करायचं ते सांगा, संतोष बांगर पुन्हा एकदा वादात

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 15 Views 1 Min Read
1 Min Read

हिंगोली : महाराष्ट्रात जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यापासून एका आमदाराचं नाव सातत्यानं चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात कायम आहे. हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर सुरत गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या बहुमत चाचणी वेळी ते ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत गेले. तेव्हापासून संतोष बांगर हे सातत्यानं अनेक गोष्टींमुळं वादात अडकत असतात. आता देखील संतोष बांगर यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बांगर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडिलांनी मतदान कुणाला करावं यासंदर्भात प्रश्न विचारला आहे.

- Advertisement -

शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यासोबत धक्कादायक संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंगोलीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी मतदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने चर्चेत राहतात. त्यांनी हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या लाख गावांमध्ये शाळेमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक संवाद केला आहे. ते लाख गावांमध्ये गावातील विकासकांचे उद्घाटन व शाळेमध्ये विकास कामाच्या भूमिपूजन निमित्ताने कार्यक्रमाला गेलेले होते. यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत बोलताना त्यांनी धक्कादायक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article