प्राणघातक ठरतोय कोरोना, भारतात 24 तासात 6 मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 12 Views 1 Min Read
1 Min Read

मागच्या 24 तासात देशात कोरोना संक्रमणामुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये तिघांचा मृत्यू झालाय. त्याशिवाय कर्नाटकमध्ये दोन आणि पंजाबमध्ये कोरोना संक्रमणामुळे एक मृत्यू झालाय. मागच्या दोन आठवड्यात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा 22 पर्यंत पोहोचलाय. त्याशिवाय नव्याने रुग्णसंख्याही वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एक्टिव झाले आहेत. कोरोनाचा नवीन वेरिएंट JN.1 च्या ट्रॅकिंगचा वेग वाढवण्यात आलाय.

- Advertisement -

भारतात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतेय. केरळ सर्वाधिक डेंजर झोनमध्ये आहे. आरोग्य विभागाच्या रिपोर्ट्नुसार मागच्या 24 तासात देशात 358 रुग्णांना कोरोनाची लागण झालीय. यात कोरोनाच्या 300 केसेस एकट्या केरळमधील आहेत. कोरोनामुळे मागच्या 24 तासात 6 मृत्यू झाले आहेत. देशात एक्टिव केस 2669 आहेत. केरळमध्ये एक्टिव रुग्ण संख्या वाढून 2341 झालीय. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्यामते केरळमध्ये कोरोना रुगणसंख्येत झालेली वाढ चिंतेचा विषय नाही. राज्यात कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article