बीडच्या सरस्वती विद्यालयाच्या इमारतीवर चढून पुरवल्या कॉप्या

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 27 Views 1 Min Read
1 Min Read

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला  आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क परीक्षा केद्रांच्या बिल्डिंगवर चढून कॉप्या पुरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आला आहे.

- Advertisement -

आजपासून बारावीच्या परीक्षा (HSC Exam) सुरू झाल्या असून या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. तरी, देखील बीडच्या तेलगावामध्ये असलेल्या सरस्वती महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थी परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

आज बारावीचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर असून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी बाहेरून कॉप्या करू नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. मात्र, सरस्वती महाविद्यालयाच्या मागील इमारतीच्या मागील बाजूने विद्यार्थी जीव धोक्यात घालून इमारतीवर चढून परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

- Advertisement -

Share This Article