नवी दिल्ली : नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीही आनंदवार्ता घेऊन येऊ शकते. केंद्र सरकार नवीन वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट देऊ शकते. निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार २०२४ च्या सुरुवातीला महागाई भत्ता आणि (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. DA मध्ये ४% वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५०% पर्यंत वाढेल.
- Advertisement -
दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केंद्र सरकार ४८ लाखांहून अधिक कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांचा जानेवारी ते जून या महिन्यांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवून देते. परंतु पुढील वर्षी २०२४ मध्ये केंद्र सरकार जानेवारी ते जून महिन्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणे अपेक्षित असून २०२४ मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकार मार्च महिन्यात नव्हे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घेऊ शकते. पुढील वर्षी एप्रिल ते मे दरम्यान होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आचार संहिता लागू होईल.
- Advertisement -
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्याबरोबरच निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई सवलतीतही वाढ होईल. DA आणि DR मधील वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनवर होणार. सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ४६% डीए व डीआर दिला जात असून पुढील वर्षी सरकारने महागाई भत्ता ४% वाढवला तर DA ४६% वरून ५०% होईल.