शिवभक्तांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको

Omprakash Motipawale
Omprakash Motipawale 1 View 1 Min Read
1 Min Read

तुळजापूर,दि. 18 : धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान पोलिसांकडून शिवभक्तांवर करण्यात आलेल्या
लाठीचार्जच्या निषेधार्थ शनिवारी तुळजापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

- Advertisement -

तुळजापूर शहरातील जुन्या बस स्टॅन्ड समोरील चौकात शहरातील शिवशंभुप्रेमींनी रस्ता रोको आंदोलन करीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवला. धाराशिव शहरातील इंगळे गल्ली परीसरात सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करून
मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकत्यांवर लाठीचार्ज केला. यामध्ये मंडळाचे पदाधिकारी, सदस्य जखमी झाले.
संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राज्यभर
आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक अमर मगर, सुदर्शन वाघमारे, महेश गवळी, प्रशांत सोंजी,आण्णासाहेब क्षीरसागर, कुमार टोले, गिरीश लोहारेकर, सत्यजित साठे, अजय साळुंके, अनिल हंगरगेकर, बालाजी जाधव, परीक्षेत साळुंके, गणेश पाटील,दिनेश धनके, सौरभ धर्माधिकारी, ओमकार बोबडे, संतोष भोरे, अक्षय साळवे आदींसह शिवभक्तांची स्वाक्षरी आहे.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article