मोठी बातमी : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, चार राऊंड फायर झाल्याची माहिती

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 32 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार (Firing) झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट (Galaxy Apartment) निवासनाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळाली आहे. पहाटेच्या सुमारास दोन जणांची दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. तपासाअंती अधिक माहिती समोर येईल, सध्या पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरु आहे.

- Advertisement -

याआधी चिठ्ठी आणि मेलद्वारे धमकी

यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना 2022 मध्ये एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’, असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पिस्तूलचं लायसन्स देखील देण्यात आलं होतं. तसेच खाजगी सुरक्षारक्षकांमध्ये देखील वाढ करण्यात आली होती. नोव्हेंबर 2023 मध्येही धमकीचा ईमेल ही आला होता. त्यात पुन्हा आता गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

भाईजानच्या घराबाहेरील गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध?

सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचं पथक दाखल झालं असून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी आणि तपास करण्यात येत आहे. आजच्या गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिश्नोई गँग सलमानला धमकी काय देत आहे, यामागचं कारण जाणून घ्या.

नेमकं प्रकरण काय?

  • 1998 साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता.
  • सलमान खानने दोन वेळ चिंकारा हरणांची शिकार केल्याला आरोप आहे.
  • लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं.
  • अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमानवर प्रचंड राग आहे.
  • याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.

Share This Article