शिर्डी काँग्रेस शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 23 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी घेतली जखमी पदाधिकाऱ्यांची भेट
  • दोघे गंभीर जखमी

अहमदनगर: काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना हा हल्ला झाला. दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झाला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे मंगळवारी सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत असताना दहा ते बारा जणांनी अचानक गाडी समोर येत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी गावात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे दोघे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी जमली होती. हल्ल्याची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सचिन चौगुले यांनी विखेंवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील वाद समोर आला आहे. नेमके हल्लेखोर कोण हे शोधण्याचं पोलिसांसमोर आता आव्हान असून पोलीस काय कारवाई करतात याकडेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलय.

Share This Article