अशोक चव्हाणांनी कॉंग्रेस सोडली

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 55 Views 1 Min Read
1 Min Read

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा  राजीनामा दिला आहे.  पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या कॉपीमध्ये विधानसभा सदस्याचा पुढे माजी हा शब्द लिहण्यात आलेला आहे. या वरून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा  राजीनामा त्यांना काँग्रसे अध्यक्ष नाना पटोले  यांच्याकडे दिला आहे. आता अशोक चव्हणांची पुढील राजकीय दिशा काय असणार यकडे सर्वांचे लक्ष लगले आहे.

- Advertisement -

अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी आमदरकीचा ही राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याचीही माहिती आहे.  14  फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशोच चव्हाण यांच्यासोबत काही आमदार देखील जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राजीनाम्यात नेमकं काय म्हटलय?

मी 12 फेब्रुवारी 2024 मध्यान्हनंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे.

- Advertisement -

आपला विश्वासू,

अशोकराव शंकरराव चव्हाण

Share This Article