जयंत पाटील निवडून आलेले नव्हे निवड झालेले प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गटाचा युक्तिवाद; आमदार अपात्रता प्रकरणावरुन घमासान

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 17 Views 5 Min Read
5 Min Read

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांच्यासमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची  सुनावणी सुरु आहे. अध्यक्षांसमोर जयंत पाटलांची   उलट साक्ष घेतली जातेय. यादरम्यान जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवलं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणाीत जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटील यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. 2022  सालीच जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपला  होता. अजित पवार गटाचे वकिलांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

मला प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवले  

जयंत पाटील यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे तीन वर्षांसाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरु राहतोय. जयंत हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांचा आहे.  मी निवडून आलेलो असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवल्याचा खुलासा  जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे वकिल  यांच्यातील युक्तीवाद 

अजित पवार गटाचे वकिल: तुम्ही पक्षात कुठल्या पदावर होता व कधी, तुमची निवड कशी झाली?

पाटील : होय मी प्रदेश अध्यक्ष पदावर होतो, निवडणूक झाली व माझी निवड झाली

जयंत पाटील : 2019 पासtन मी या  पदावर आहे. 2018 साली माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 2022 साली विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुका पार पडत होत्या. विविध राज्यात निवडणुका पार पडल्या होत्या. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पवार साहेबांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2018  साली निवडणूक झाली, त्यात माझी राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली.2022 मध्ये राज्य पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सुरु होती. त्यात काही जिल्ह्यातील पदाधिकारी निवड झाली तर काही जिल्ह्यात ती सुरु होती.  राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली . राष्ट्रीय निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर दिल्लीत नॅशनल कन्व्हेन्शन पार पडली. त्यात शरद पवार यांना कार्यालय निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले. इतर राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मला माहिती नाही, पण माझ्या निवडीचे पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मला मिळाले

वकिल : याचा अर्थ तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून आला नाही तर तुमची निवड शरद पवार यांनी केली?

पाटील : कमिटीचा कार्यकाळ हा सुमारे ३ वर्षांचा असतो. त्यावेळी मी निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो. राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक सुरु होती. पण तोपर्यंत मी कमिटामार्फत निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो

वकिल :तुम्ही २०१८पासून प्रदेशाध्यक्ष होता?

पाटील : मी सांगितले की सुमारे तीन वर्षांचा कमिटीचा कार्यकाळ असतो फक्त तीन वर्षांचा असतो असे नाही. त्यामुळे राज्य पातळीवर निवडणूक पूर्ण होईपर्यंत ही कमिटी कार्यरत असते. तसेच माझी निवड प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहते.

वकिल :२०२२ साली राज्य कमिटीची निवडणूक होईपर्यंत तुमची प्रदेशाध्यक्ष पदी निवड कुणी केली किंवा तुम्ही निवडून कसे आला?

पाटील : २०२२ नंतर जिल्हा कमिटीची निवडणूक झाली असे मी म्हटलं नाही.राज्य कमिटीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती, असे मी नमूद केले आहे.

वकिल : तुमच्या मते २०२१ साली सुरु झालेली राज्य कमिटीची निवडणूक कधी संपली? की ती अजूनही सुरु आहे?

पाटील : प्रक्रिया सुरु आहे. काही लोक पक्षातून बाहेर पडले, त्यामुळे काही जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने सुरु आहे. त्यामुळे राज्य कमिटी निवडणूक घेता आलेली नाही.

वकिल : राष्ट्रीय कमिटीची निवड कशी होते? निवडणूकीद्वारे की निवडी द्वारे?

पाटील : सर्व राज्यातील प्रतिनिधी राष्ट्रीय कमिटीचे सदस्य आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार यांची निवड करतात.

वकिल : अर्थात सर्व राज्य कमिटीच्या निवडणूक झालेल्या नसतील तर घटनेप्रमाणे राष्ट्रीय कमिटीची स्थापना वैध ठरू शकत नाही, हे खरे आहे का?

(शरद पवार गटाच्या वकिलांनी या प्रश्नावर आक्षेप घेतला आहे)

जयंत पाटील:  मी असे म्हणालो नाही की सर्वच राज्यात निवडणुका सुरू होत्या. महाराष्ट्रात सुरू होत्या. त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. पक्षाच्या घटनेनुसार अस्तित्वात असेलेले सर्व पद त्या राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात.

वकिल:  कार्यक्रम सर्व निवडणुकांना लागू होतो का?

जयंत पाटील: हा कार्यक्रम सर्व देशभरातील निवडणुकींसाठी लागू होता. पण त्यानंतर हा कार्यक्रम  आधी एका पत्रानुसार पुढे ढकलण्यात आला.

Share This Article