मुलांसाठी आता अपार कार्ड, फायदे तरी काय?

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 8 Views 2 Min Read
2 Min Read

आधार कार्ड आता देशातील नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाले आहे. रेशन कार्डपासून ते सिम कार्ड खरेदीपर्यंत आधारची मदत होते. बँक खाते, डिमॅट खाते, मुलांचा शाळेतील प्रवेशासाठी आधार कार्ड उपयोगी ठरते. आता राष्ट्रीय स्तरावर आणखी एक कार्ड येऊ घातले आहे. एक कार्ड, एक विद्यार्थी या संकल्पनेवर हे कार्ड तयार होत आहे. येत्या काळात मुलांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे. केंद्र सरकारने या कार्डचे नाव अपार आयडी कार्ड असे ठेवले आहे. जाणून घ्या त्याचे काय आहेत फायदे…

- Advertisement -

केंद्र सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने अपार आयडी कार्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचे हे ओळखपत्र आहे. ‘ एक राष्ट्र, एक विद्यार्थी कार्ड’ या संकल्पनेवर ते आधारीत आहे. केंद्र सरकार नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरण घेऊन आले आहे. त्यातंर्गत हे कार्ड तयार करण्यात येत आहे.

- Advertisement -

काय आहे ‘अपार कार्ड’?

- Advertisement -

‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री’ असे अपार कार्डचे सविस्तर नाव आहे. हे कार्ड 12 आकड्यांचे आहे. लहानपणापासून ते विद्यार्थ्यांचे शिक्षण होईपर्यंत हे कार्ड त्याची ओळख असेल. विद्यार्थ्याने शाळा बदलली तरी अपार आयडी कार्ड एकच असेल. ते बदलणार नाही. अपार कार्ड हे आधार कार्डपेक्षा वेगळे असेल. आधार आणि अपार कार्ड हे संलग्न असतील. ते लिंक असतील. या कार्डमधील माहिती आपोआप अपडेट होत राहील. डिजीलॉकर सारखे हे विद्यार्थ्यांसाठी एडूलॉकर असेल.

कोणत्या कामासाठी ठरेल उपयोगी?

‘अपार कार्ड’ मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येईल. हे कार्ड म्हणजे त्यांचे शिक्षण माहितीपत्रच असेल. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसं मिळाली, प्रमाणपत्र मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याचा आलेखच हे कार्ड असेल. त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देण्यात येईल. त्यांच्या गुणवत्तेचा आलेख असेल. शाळा बदलली तरी ही माहिती जतन असेल.

कसे तयार होणार ‘अपार कार्ड’ ?

‘अपार कार्ड’ तयार करण्यासाठी विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ‘डिजिलॉकर’ वर त्याचे खाते असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे केवायसी पूर्ण होईल. ‘अपार कार्ड’ संबंधित शाळा, महाविद्यालये नोंदणी करुन देतील. त्यासाठी आई-वडिलांची सहमती घेण्यात येईल.

Share This Article