अमितभैय्या तुमच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा, आता वेळ आलीये-पाऊल टाका : रितेश देशमुख

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 67 Views 2 Min Read
2 Min Read

लातूर: अमितभैय्या तुमच्याकडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत, आता वेळ आलीये. तुम्ही पावलं उचलली पाहिजेत, असे सूचक वक्तव्य अभिनेते रितेश देशमुख यांनी केले. त्यावर केवळ लातूरात अडकून पडू नका. महाराष्ट्रात फिरा. काँग्रेसला तुमच्यासारख्या तरुण नेतृत्वाची गरज आहे. ज्येष्ठ नेते तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत, असे उद्गार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.

- Advertisement -

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमधल्या पूर्णाकृती पुतळ्याचे निमित्त होते. कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, अभिनेते रितेश देशमुख उपस्थित होते. यावेळी सगळ्यांनीच विलासरावांच्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्टे सांगताना त्यांचं आणि काँग्रेसचं नातं अधोरेखित केलं.

- Advertisement -

सध्याच्या काळात राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषणं होतायेत. हे पाहून दुःख वाटतं. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला, ते सध्या आज दिसत नाही. तो काळ परत आणण्याची गरज आहे. अमितभैय्या तुमच्याकडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत, आता वेळ आलीये. तुम्ही पावलं उचलली पाहिजेत, असे वक्तव्य अभिनेते रितेश देशमुख यांनी केले.

- Advertisement -

काँग्रेसच्या संघर्षाच्या काळात राज्यात फिरले पाहिजे, आम्ही ज्येष्ठ तुमच्या पाठीशी आहोत. पुढचा भविष्यकाळ तुमचा आहे. तुम्ही जसं लातूर सांभाळताय तसं महाराष्ट्र आणि देशही सांभाळण्याची तुमच्यात ताकद आहे. प्रचंड क्षमता तुमच्यात आहे. मतदारसंघात काम खूप असतं. परंतु तिथे कार्यकर्त्याचं जाळं कामाला येतं. लातुरात तुमच्या कार्यकर्त्यांचं जाळं खूप मजबूत आहे. तुम्ही आता बाहेर पडा, असे थोरात अमित देशमुख यांना म्हणाले. विलासराव देशमुख यांचे पुत्र म्हणून खूप मोठा वारसा मिळाला आहे, त्यामुळे काँग्रेसच्या संघर्षाच्या काळात राज्यात फिरले पाहिजे, आम्ही ज्येष्ठ तुमच्या पाठीशी आहोत, असेही थोरात म्हणाले.

Share This Article