अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचा दावा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 39 Views 2 Min Read
2 Min Read

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे त्यांनी थेटपणे सांगितले नसले तरी त्यांनी तसे उघड उघड संकेत दिले आहेत. राजीनाम्याची गोष्ट कधीपासून तुमच्या डोक्यात सुरू होती, असा प्रश्न ज्यावेळी पत्रकारांनी विचारला त्यावेळी सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, असं म्हणून त्यांनी यावर अधिकचं बोलणं टाळलं. परंतु शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी अशोक चव्हाण यांच्याविषयी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. राजीनाम्याची बिजं कधीपासून पेरली गेली, हेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

- Advertisement -

आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांची अजित पवार यांच्या सोबत दि. २७ की २८ जून २०२३ रोजी मुंबईत देवगिरी या शासकीय बंगल्यावर गुप्त बैठक झाली होती. देवगिरीवर त्याच दिवशी अजितदादांनी मला बोलावून घेतले होते. दादांची माझी राजकीय सद्यस्थिती बाबत चर्चा चालू असताना अशोक चव्हाण तिथे आल्यावर मग दादांनी मला आपण नंतर चर्चा करू असे सांगितले व मी तिथून बाहेर पडलो.

- Advertisement -

त्यानंतर त्यांची दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली होती. अजितदादा आणि अशोक चव्हाण यांचा निर्णय तेव्हाच झालेला होता. त्यानंतर लगेच दि. २ जुलै २०२३ रोजी अजितदादा मित्र मंडळ राज्य सरकार मध्ये सामील झाले. आता अशोक चव्हाण काँग्रेस मधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. मला त्यात धक्कादायक काहीच वाटत नाही.

- Advertisement -

ते भाजपा किंवा कदाचित अजितदादा गटात सुध्दा जातील कारण अजितदादा मित्र मंडळ आणि अशोक चव्हाण हे ईडी ग्रस्त असल्याने समदुःखी आहेत. जेल मध्ये जाण्यापेक्षा भाजपा सोबत गेलेले बरे .असे सद्या देशभर वातावरण आहे. साम दाम दंड भेद या भाजपच्या राजनीतीचे देशाला दररोज दर्शन होत आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजपाने जगाला दाखवून दिले आहे. आपली संसदीय लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात आहे हे नक्की !

Share This Article