अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 27 Views 2 Min Read
2 Min Read

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी  करण्यात आली आहे. श्रेयसची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

- Advertisement -

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाचं श्रेयस तळपदे शूटिंग करत होता. या सिनेमाच्या शूटिंगनंतर तो त्याच्या घरीही गेला होता. घरी गेल्यानंतर अचानक त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला अंधेरी पश्चिम येथील बेलव्यू रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने अँजिओप्लास्टी केली.

- Advertisement -

श्रेयस तळपदेची तब्येत आता स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. आज किंवा उद्यापर्यंत श्रेयस तळपदेचा डिस्चार्ज मिळू शकतो. श्रेयसच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अशातच आता त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

श्रेयस तळपदे 14 डिसेंबर 2023 रोजी ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाचं शूटिंग करत होता. या सिनेमाच्या शूटिंगनंतर तो सेटवरुन घरी गेला. शूटिंगदरम्यान तो पूर्णपणे ठिक होता. त्यावेळी त्याने अनेक अॅक्शन सीन्सचं शूटिंग केलं. शूटिंगमधून घरी गेल्यानंतर अस्वस्थ असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. पत्नीने त्याला लगेचच रुग्णालयात नेलं. पण वाटेत त्याला हृदयविकाराचा झटका आला.

श्रेयस तळपदे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. तसेच बॉलिवूड आणि साऊथमध्येही त्याने अभिनयाची छाप पाडली आहे. आजवर त्याने 45 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. सध्या तो बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारच्या  ‘वेलकम टू द जंगल’ या बहुचर्चित सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात श्रेयस आणि अक्षयसह  रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Share This Article