पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवात अचानक आग, प्रेक्षकांची प्रचंड धावपळ

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 21 Views 1 Min Read
1 Min Read

 पुणे  : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली. सवाई गंधर्व कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. आग छोट्या स्वरूपाची असल्याने कुठलंही नुकसान झालं नाही. रंगमंचाच्या मागे असणाऱ्या एका खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. अवघ्या 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आयोजकांना यश आलं. पण अचानक आग लागल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी धावपळ उडाली. 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आता सर्व काही सुरळीत सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

- Advertisement -
शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग होती. काही वेळ प्रेक्षक घाबरलेल्या अवस्थेत होते.
कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी असलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे.

 

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article