दिवाळीचं गिफ्ट अन् मिठाई नेताना भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 12 Views 2 Min Read
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : कर्तव्य बजावून पोलीस निरीक्षकांनी दिलेली दिवाळीची मिठाई व भेटवस्तू घेऊन घराकडे निघालेल्या पोलीस शिपायाचा भीषण अपघात झाला. दुचाकी समोर भरधाव टेम्पोने अचानक ब्रेक लावल्याने पोलीस शिपायाची दुचाकी टेम्पोवर धडकून यामध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोलवाडी फाट्याजवळ घडली. घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.

- Advertisement -

स्वप्निल महेंद्र अवचरमल (वय २५. रा.हनुमान टेकडी बेगमपुरा) असं मयत पोलीस शिपायाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निल हे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. स्वप्निल अवचरमल यांचे वडील महेंद्र यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपातत्त्वावर स्वप्निल हे ५ मे २०१९ रोजी पोलीस दलात भरती झाले.

- Advertisement -

दरम्यान, एमआयडीसी वाळूज ठाण्यामध्ये ते चालक म्हणून नोकरी करत होते. बुधवारी रात्री आपलं कर्तव्य बजावून दिवाळीची मिठाई व भेटवस्तू घेऊन शहरात बेगमपुरा येथे असलेल्या घराकडे निघालेल्या स्वप्निल यांची दुचाकी गोलवाडी फाट्याजवळ आल्यानंतर एमएच २० एसटी ४८३२ क्रमांकाच्या टेम्पोने वळणावर अचानक ब्रेक लावला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या स्वप्नील यांची दुचाकी टेम्पोवर धडकली. यामध्ये स्वप्निल दुचाकीवरून बाजूला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सहाय्यक उपनिरीक्षक वेदावाड यांनी स्वप्नील यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे अवचरमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. स्वप्निल यांच्या पश्चात आई, सहावीत शिकणारा लहान भाऊ असा परिवार आहे.

- Advertisement -

दरम्यान, बुधवारी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई व भेटवस्तू दिल्या होत्या. हीच भेटवस्तू व मिठाई घेऊन स्वप्निल घरी जात होते. मात्र, वाटेत काळाने घाला घातला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस ठाण्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

Share This Article