एका हातात पुतण्या, दुसऱ्या हातात साप; काकाला रुग्णालयात पाहून सारे हादरले

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 35 Views 2 Min Read
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर: १४ वर्षे मुलाच्या पायाच्या अंगठ्याला सर्पदंश झाला. ही बाब मुलाच्या चुलत्याच्या लक्षात येताच त्यांनी सापाला पकडले आणि पुतण्याला घेऊन थेट रुग्णालय गाठलं. मुलाला साप चावला उपचार करा असं म्हणताच रुग्णालयातील कर्मचारी घाबरून गेले. यावेळी उपचार करण्यासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात जाण्याची वेळ आली. अखेर छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात मुलावर उपचार करण्यात आले. कोणता साप चावला असं डॉक्टर विचारत असल्यामुळे मुलाने थेट बरणी उशाला ठेवून हा साप चावला असे सांगितले. मुलाला साप चावल्यामुळे घाबरून गेलेले नातेवाईक आणि डॉक्टर यांना साप विषारी नसल्याचे लक्षात येतात सर्वांचा जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या अजिंठा गावात असलेल्या एका निजामकालीन बारवेतून एक साप बाहेर आला. यावेळी बारवीजवळ असलेल्या शेख अमान शेख राशीद या चौदा वर्षीय मुलाला या सापाने दंश केला. दरम्यान, मुलाला साप चावल्यामुळे कुटुंबातील सर्वजण घाबरले. दरम्यान, यावेळी अमान याचे काका शेख चाँद यांनी तो साप पकडला आणि अमानला घेऊन थेट सिल्लोड येथील रुग्णालय गाठलं. मात्र, हातात साप आणि मुलाला सर्पदंश झाल्याचं बघून डॉक्टर देखील घाबरून गेले. मुलावर प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी तात्काळ छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल होताच अमान याच्या काकांनी डॉक्टरांना हा साप चावला माझ्या पुतण्यावर उपचार करा असं म्हणाले. यावेळी साप बघून डॉक्टर देखील घाबरले. यावेळी डॉक्टरांनी त्या सापाला बरणीत टाकण्यास सांगितलं. अमानवर उपचार सुरू असताना डॉक्टर कोणता साप चावला? कुठे चावला? कसा चावला? हे विचारत असल्यामुळे अमानने चावलेल्या सापाला आपल्या उशाला ठेवून हा साप चावला असं सांगत उपचार घेत आहे. दरम्यान, अमान याच्यावरती सध्या छत्रपती संभाजी नगरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

Share This Article